वधुपरीक्षेसाठी मुलाकडचे लोक मुलीकडे आल्यावर त्यांचे स्वागत वगैरे होते. सगळ्यांना बसायला सांगितल्यावर सगळे बसतात. दुर्दैवाने मुलगा ज्या खुर्चीत बसायला जातो त्या खुर्चीत काही गडबड असल्यामुळे मुलगा बसताच ती काडकन् मोडते आणि मुलगा खाली पडतो.
त्या आवाजाने मुलगी आणि इतर स्त्रिया बाहेर येतात तेव्हा न राहवून मुलगी म्हणते, " ..... अग बाई, कावळा बसायला आणि फांदी मोडायला म्हणतात तसं झालं अगदी ....."