चुपचाप तू ऐकून घे आता मला
मौनास माझ्या छेडले आहेस तू !

आता मला माळूनही घेशील ना ?
मातीतुनी मज वेचले आहेस तू  !

कोरेपणासुद्धा तुझा मी वाचला...
तेथे मला उल्लेखले आहेस तू !

लाजायचे ? लाजून घे...पण सांग ना...
हे चांदणे का नेसले आहेस तू ?

हे आवडले.
मतला फारसा आवडला नाही.