पन्नाशीची डायरी येथे हे वाचायला मिळाले:
दि. ११/६/१९५२, उद्या १२ जून. कॉलेज उद्यापसून सुरु होईल पण त्याची कालपासून तयारी करतोय. चप्पल दुरुस्त करुन आणल, सायकलच हॅंडल वाकड झालेल ते दुरुस्त केल. दिड रुपयांचा भुर्द्ंड बसला. हे शेटकर कुठेही पोती ठेवतात आणि ती नेमकी माझ्याच सायकलवर पडावित? जाऊ दे, त्यानिमित्यान सगळी सायकल नजरेखालून गेली हे बर झाल.