ज्या लोकांचा हिंदू धर्मावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, आत्मियता आहे अशा लोकांपैकी ज्याना होमाच्या विधीबद्दल जाणून घेण्याचे औत्सुक्य आहे त्यांच्यासाठी मी हा लेख लिहिला आहे. हा विधी करण्यामागची संकल्पना, साहित्य काय लागते, परिणाम काय होतो याची कल्पना यावी हाच या लेखामागचा हेतू होता. आपण आजही नवीन घर घेतल्यावर वास्तुशांतीसाठी होमकरतो, विवाह, मौंज, वाढदिवस, श्राद्ध आदी कामासाठी होम करतो. या लेखावर टीका करणाऱ्यानीही असा विधी केला असेलच. ज्याना या विधीमुळे अनुभव आले आहेत अशी अनेक उदाहरणे आहेत.

आता २०% लोक अर्धपोटी असले तरी आपण मोटरगाडीतून, मोटारसायकलवरून फिरतोच ना? महागड्या हॉटेलमध्ये जावून हजारो रुपयाची बिले भरतोच ना? भारी चैनीच्या वस्तू खरेदी करतोच ना? तुम्ही म्हणाल ज्याना शक्य आहे ते ही कामे करतील. तसेच होमाचे आहे. ज्याला होम करणे शक्य आहे व कारण आहे त्यानी तो करावा. याचा कोणाला आग्रह नाही. ज्यांची यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे व ज्याला हे करणे परवडते त्यांच्यासाठी हा लेख मार्गदर्शन आहे.

होम म्हटल्यावर ज्वलन हे आलेच. मात्र यात जळणारी लाकडे प्रदुषणविरहित असून याबरोबर म्हटल्या जाणाऱ्या मंत्रामुळे, ज्या जागेत यज्ञ केला जातो तो परिसर बाधानिवारक स्पंदनांनी भारला जातो. त्याचा परिणाम मनावर होऊन मन पवित्र व शुद्ध होते. हा होम करताना कांही नियमाचे पालन करावे लागते. यावेळेस आमलेट करणे, मांसाहार किंवा धुम्रपान हे निषिद्ध आहे. तसे केल्यास यज्ञाचा हेतू नष्ट होतो. एकाद्या आजारी माणसास अवपथ्य केल्यावर ज्या परिणामांना सामोरे जावे लागते तसेच हे आहे.

या लेखात दिलेली उदाहरणे १००% सत्य आहेत. त्याची शानिशा करण्याची मला गरज वाटत नाही. ज्यावेळी भोपाळ गॅसकांड झाले होते त्यावेळी ही हकिकत तेथील लोकल पेपर मध्ये आली आहे. ती रेकॉर्डवर आहे. त्यामुळे तुम्ही त्याची सत्यता पडताळून पाहू शकता. शिवाय यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर सोडून द्या. आपल्या मानात आले म्हणून कंहीतरी पास केलेले हे तर्क किंवा अभिप्राय असावेत असे माझे मत आहे. सर्वात शेवटी पुन्हा मला सांगावयाचे आहे की मी हा लेख माहितीसाठी लिहिला आहे. आपण सहमत नसाल तर आपण तो विसरून जावा. या लेखाबाद्दलचे माझे स्पष्टीकरण देऊन मी याबाबतची चर्चा संपवतो.