नमस्कार मिलिंदजी,
याचा संदर्भ मी देऊ शकत नाही. कारण मी हे कुठेतरी वाचले होते. ते माझ्या मनात घर करून बसले. आजची परिस्थिती बघता हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे ह्या तळमळीने लिहिले. आपण आजुबाजूला बघतच आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी मुलीच झालेल्या दिसतात. कदाचित हे खरे असेलही. मी हे बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले होते. तेव्हा भृणहत्या हा प्रश्न इतका गंभीर नव्हता. लिंग परीक्षा इतकी कायद्याने बंद झाली नव्हती. त्यामुळे हे मनात कुठेतरी राहिले होते. आज मात्र हे उफाळून वर आले. हे वाचून कोणी एक दोघे जरी शहाणे झाले तरी खूप काही होईल असे वाटते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.