स्त्री व पुरुष यांचा संख्यात्मक समतोल निसर्गतःच राखला जातो हे माझ्याही वाचनात आले आहे.
एडवर्ड बोनो यांच्या क्रिएटिव्हिटीवरील एका पुस्तकात लोकसंख्या नियंत्रणासाठी एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे प्रत्येक जोडप्याने मुलगा होईपर्यंत प्रजोत्पादन करीत राहावे व मुलगा झाल्यावर बंद करावे. त्या संदर्भात विश्लेषण करतांना त्यांनी स्त्रिया व पुरुष यांचा संख्यात्मक समतोल निसर्गतःच राखला जातो असे नमूद केल्याचे आठवते. पुस्तकाचे नाव ताबडतोब देता येत नाही पण सापडल्यावर नक्की संदर्भ व तपशील येथे देईन.