ज्या विधानाचा आपण विश्वसनीय संदर्भ देऊ शकत नाही अशी विधाने करणे योग्य नाही. निसर्ग आपणहून समतोल राखतो वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास ठेऊ नये. आणि समजा समतोल राखतही असला तरी ते सिद्ध करणे अतिशय कठीण आहे.  भारतात जन्मणार्‍या मुलींची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आणि त्याची भरपाई म्हणून टुन्ड्रा प्रदेशात मुलग्यांचे जननप्रमाण वाढले तरी आपल्याला पत्ता लागणार नाही. कीटकांमध्ये आणि पशूंमध्ये एका गटात एकच नर असतो आणि बाकी सर्व माद्या. मानवजात पुढारलेली असल्याने तिथे असला प्रकार नाही हे आपले नशीब.

प्रत्येक जोडप्याने मुलगा होईपर्यंत प्रजोत्पादन करीत राहावे व मुलगा झाल्यावर बंद करावे. हे विधान करणारा एडवर्ड बोनो आपल्या देशातील खेडवळ माणसापेक्षा जास्त पुराणमतवादी असावा. मुलगा होईपर्यंत प्रजोत्पादन करावे असल्या खुळचट रूढीवजा समजुतींमुळेच भारताची लोकसंख्या अतोनात वाढली. --अद्वैतुल्लाखान