चर्चेचा प्रस्ताव ठेवणाऱ्याने चर्चा अर्धवट सोडू नये असा संकेत (नियम नाही! ) आहे, त्यामुळे प्रस्तावकर्त्याचा वरील प्रतिसाद 'एस्केपिस्ट' स्वरुपाचा वाटला.
हिंदू धर्मावर विश्वास आणि होम या वेगवेगळ्या कल्पना आहेत. त्यांत गल्लत करू नये.
आता २०% लोक अर्धपोटी असले तरी आपण मोटरगाडीतून, मोटारसायकलवरून फिरतोच ना? महागड्या हॉटेलमध्ये जावून हजारो रुपयाची बिले भरतोच ना? भारी चैनीच्या वस्तू खरेदी करतोच ना? तुम्ही म्हणाल ज्याना शक्य आहे ते ही कामे करतील.
असे करणे व होम याच्यातही फरक आहे. प्रदूषण एवढा एकच मुद्दा घेतला तरी पुरे.
होम म्हटल्यावर ज्वलन हे आलेच. मात्र यात जळणारी लाकडे प्रदुषणविरहित असून याबरोबर म्हटल्या जाणाऱ्या मंत्रामुळे, ज्या जागेत यज्ञ केला जातो तो परिसर बाधानिवारक स्पंदनांनी भारला जातो. त्याचा परिणाम मनावर होऊन मन पवित्र व शुद्ध होते. हा होम करताना कांही नियमाचे पालन करावे लागते. यावेळेस आमलेट करणे, मांसाहार किंवा धुम्रपान हे निषिद्ध आहे. तसे केल्यास यज्ञाचा हेतू नष्ट होतो.
हे पटणे कठीण आहे. प्रदूषणविरहित ज्वलन अशक्य आहे, असे विज्ञान सांगते. येथे श्रद्धेचा प्रश्न नाही. होम करताना आम्लेट करणे निषिद्ध हेही समजण्यापलीकडचे आहे. होमातील शक्तींना आम्लेट केले जात आहे, हे ओळखण्याची कसोटी ज्ञात असते हे सिद्ध करता येईल असे वाटत नाही. आम्लेटचा धूर आणि वास आणि होमाचा  धूर आणि वास यात बाकी सामान्य माणसाला फरक करता येईल.
ज्यावेळी भोपाळ गॅसकांड झाले होते त्यावेळी ही हकिकत तेथील लोकल पेपर मध्ये आली आहे. ती रेकॉर्डवर आहे.
दुर्दैवाने, वर्तमानपत्रांत जे जे छापून येईल ते खरे, असे मानण्याची स्थिती नाही. शेवटी चिकित्सा करणे हा वृत्तीचा एक भाग आहे, ज्याला धर्मपीठांनी कायम विरोधच केला आहे. चिकित्सा केली की त्रास होतो, क्वचित आपण आजवर ज्यावर गाढ श्रद्धा ठेवली ते ढासळण्याची शक्यता तयार होते. म्हणून मग 'गुरोर्वाक्यं प्रमाणम' हे बरे, अशीच लोकांची धारणा असते.
वादासाठी वाद हा या प्रतिसादांचा हेतू नाही. यातून काहीतरी मंथन व्हावे, ही अपेक्षा आहे.