या लेखातील शेवटची दोन वाक्ये लिहिण्याचे कारण म्हणजे बेंगलोर येथे राहणाऱ्या श्री. एच. व्ही. कृष्णमूर्ती नावाच्या गृहस्थानी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या जीवघेण्या आजाराची सत्यकथा प्रसिद्ध केली आहे. त्या सत्यकथेत त्याना गुलीन बेअर सिंड्रोम नावाचा आजार झाला होता‍‍ जागतिक आकडेनुसार हा आजार लाखात एकाला होतो. त्यातून वाचण्याचा प्रमाण दोन लाखात एक आहे. पण या रोगाचा परिणाम शरीरावर कांहीही न होता नॉर्मल होण्याचे प्रमाण पाच लाखात एक आहे. या शेवटच्या वर्गात त्यांची केस बसते. त्यांची एवढी वेगात रिकव्हरी कशी झाली याचे जगप्रसिद्ध डॉक्टरला आश्चर्य वाटले. त्यानी त्याना विचारले की हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमचा वेळ कसा घालवत होता? असे विचारल्यावर त्यानी सांगितले, " पूर्ण दिवस मी स्वामींची भजने व प्रवचने ऐकत होतो" त्या जगप्रसिद्ध डॉक्टरच्या मते, " ही भजने ऐकल्यामुळे त्याचा परिणाम मेंदुवर झाला होता. त्यामुळे मेंदूपासून निघणाऱ्या व डोळा, घसा, कान व इतर अवयवांना जाणाऱ्या लहानलहान मज्जातंतूवर असलेल्या काळजीचा ताण/दाब कमी होण्यास मदत झाली. हॉस्पिटलमध्ये असताना जर तुम्ही काळजीत असता तर इतक्या वेगात तुन्ही बरे झाला नसता. त्या काळजीचा परिणाम तुमच्या आधीच खराब झालेल्या मज्जातंतूवर झाला असता व त्यातून बरे होणे अवघड होते. " या कथेनुसार भजनाचा परिणाम काय होऊ शकतो याचे प्रत्यंतर आले आहे. त्या एच. व्ही. कृष्णमूर्तीचा पत्ता असा आहे.  घरनंबर -२८, पोलिस स्टेशन रोड, बसवनगुडी, बंगलोर -५६०००४ आपण जास्त डिटेल माहिती येथे विचारू शकता.