प्रदीप  मुरकुटे आणि संजोप राव, दोघांशीही सहमत. लेख वाचता वाचताच माधव मोहोळकरांच्या लेखाची आठवण झाली. लगेच 'गीतयात्री' उघडून वाचलाही.
साध्या, सोप्या शब्दरचना, (क्वचित थोड्या बाळबोध?) हे तर शैलेंद्रचे वैशिष्ट्य. पण त्यानेच 'जोगी जबसे तू आया मेरे द्वारे .. मीठी मीठी अगन मैं तो सह ना सकूंगी', 'मैं नदिया फिर भी मैं प्यासी, भेद है गहरा बात जरासी', 'मैं चोर हूं काम है चोरी, हूं दुनियामें बदनाम... दिलको चुराता आया हूं मैं, येही मेरा काम .. आना तू गवाही देने ... ओ चंदाऽऽऽऽ' हेही लिहिलं आहे.
 

अर्थात गाण्याचे चित्रीकरण अर्थाशी पूर्णपणे विसंगत आहे. झुमक्याऐवजी जास्वंदीचे फूल आहे, साधना मैत्रिणीच्या आठवणीने व्याकुळ दिसायच्या ऐवजी आनंदी दिसते आहे आणि चित्रपट पाहिलेल्यांकडून समजले की त्यात साधनाच्या मैत्रिणीचे (जिचा झुमका हरवतो) पात्रच नाही.

ह्या गीताचा चित्रपटाच्या कथानकाशी काहीही संबंध नाही. माझ्या आकलनानुसार (पर्सेप्शन) मी ह्याचा असा अर्थ लावला आहे की आपण जसं आपल्याला आवडणारं एखादं गाणं आपला छान  मूड असताना  गुणगुणतो/गातो, तसंच ते गाणं साधना म्हणत असते. ('गुड्डी'मध्ये 'बोल रे पपीहरा' च्या शब्दांचा कथानकाशी काही संबंध नाही. तसेच.)

अवांतर : गाण्यात जे फूल आहे, तो जास्वंदीचा प्रकार सरसकट बघायला मिळणारा नाही. त्याच्या पाकळ्या थोड्या कातरल्यासारख्या असतात आणि त्यामुळे जरा नक्षीदार दिसतात.  आमच्या भागात त्याला कत्री जास्वंद म्हणतात. 

असो. लेख आणखी थोडा मोठा असता तरी आवडला असता. आता संजोपरावांच्या सविस्तर प्रतिसादाची वाट पाहत आहे.