अहो वाद कसला आलांय माधवकाका! सगळे शब्द सुचवत होते, म्हणून मीही सुचवले दोन-चार.
आता फरकाचे म्हणाल तर असं बघा...
परफोर्मन्स = गुणवत्ता, असे मला तरी वाटत नाही.
थोडासा पुढे जाऊन विचार केला तर परफॉर्मन्स म्हणजे काम... मग ते नाटकातले असुदे नाहीतर कचेरीतले. ( दरवर्षी पगारवाढ आपण परफॉर्मन्स अप्रैज़ल् च्या जोरावरच घेतो ना ;), गुणवत्तेच्या नाही. जैसा काम वैसा दाम! ) त्यामुळे त्याला कामाचे मोजमाप म्हणालो. चतुःसूत्री चे म्हणाल तर, तो शब्द मला चतुरस्त्र पेक्षा आवडला इतकेच.
डिमेन्शन्स...
जर का आधी लावले तर निकष नंतर केले तर मोजमाप. असे मला वाटते.
प्रॉडक्टिव्हीटी...
मी शोधत असलेला शब्द खाली सापडला "उत्पादकता"!
आणि मला असे वाटते की शब्दाला शब्द लिहून फक्त टंकांतर करण्यापेक्षा थोडा विचार केला, मूळ शब्दाचा आशय लक्षात घेतला, तर रोजच्या वापरातले सोपे आणि सुटसुटीत शब्द/शब्द-समूह वापरून छान शब्द/शब्द-समूह बनू शकतात.