माझ्या ३०-८ च्या प्रतिसादात उल्लेखलेला संदर्भ सापडला आहे तो खालीलप्रमाणे: 

एड्वर्ड डी बोनो यांचे "पो - बियाँड येस अँड नो" हे सृजनशीलतेवरील पुस्तक आहे. त्यात "पो प्रॅक्टीस" या प्रकरणात प्रश्नोत्तरे दिली आहेत. त्यातील पहिल्या गटातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर पाहावे. माझ्याकडे १९७३ सालच्या आवृत्तीची प्रत आहे त्यात पृष्ठ क्रमांक १५१ वर प्रश्न आहे व १६० वर त्याचे उत्तर आहे. त्या सगळ्याचे मराठीत भाषांतर करणे माझ्यासाठी अवघड आहे. जालावरही बोनो यांचे पुस्तक उपलब्ध आहे. दुवा देण्याचे तंत्र मला अवगत नाही.