मी हे कुठे वाचले ते मला नीट आठवत नाही. पण निसर्ग आपला समतोल राखतो हे मात्र अगदी खरेच आहे. अद्वैतुल्लाखानजी हे तुमचे खरे नाव वाटत नाही. खरे नाव द्यायला संकोच वाटत असावा. असो! टुंड्रा प्रदेशात मुलांचे प्रमाण वाढते की नाही हे मला माहित नाही. मी कधी तिकडे गेले नाही. मला त्याच्याशी काही कर्तव्य पण नाही. स्त्री भृणहत्या ही माझ्या समाजाची समस्या आहे असे मी मानते . त्यामुळे मला जे वाचल्याचे स्मरते ते मी लिहिले. त्यातून ज्यांना शहाणे व्हायचे असेल ते होतील . ज्यांना सामाजिक जाणीवच नाही ते वितंडवाद घालत बसतील. शेवटी निसर्ग आपले काम करतच राहणार आहे.