ऋचाशी सहमत आहे.
मानसशास्त्रीय स्पष्टीकरणही पटण्याजोगे आहे.
परवाच एक विनोद ई-मेल द्वारे आला होता तो येथे देतो.
एक माणूस एक असा रोबोट तयार करतो, की कुणी खोटं बोललं तर तो त्याला मुस्काडीत ठेऊन देतो.
एक दिवस त्याचा मुलगा उशिरा घरी येतो.
वडील- उशीर का झाला?
मुलगा- कॉलेजमध्ये जास्त अभ्यास होता. (ह्या वाक्यावर तो रोबोट त्याच्या कानाखाली वाजवतो)
वडील- खरं खरं सांग.
मुलगा- सिनेमा पहायला गेलो होतो.
वडील- कोणता सिनेमा?
मुलगा- लव्ह आज कल! (ह्या वाक्यावरही तो रोबोट त्याच्या कानाखाली वाजवतो)
वडील- खरं सांग कुठला सिनेमा पाहिलास?
मुलगा- लव्ह मी टिल डॉन.
वडील- मी तुझ्या वयाचा असताना असले घाणेरडे सिनेमे मी पाहात नव्हतो. (ह्या वाक्यावर तो रोबोट वडिलांच्या कानाखाली वाजवतो. )
ह्याच्या पुढील भाग मात्र मी येथे लिहू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व.