दिवाळी अंकासाठी लिखाण पाठवण्याची अंतिम तारीख उलटून गेली असली तरी अंकासाठी अद्याप पुरेसे गद्य साहित्य आलेले नाही. त्यामुळे लिखाण पाठवण्यासाठी मुदत वाढवून देण्यात येत आहे. कृपया आपले लिखाण, विशेषतः गद्य लिखाण, १५ सप्टेंबरपर्यंत पाठवावे. १५ तारखेपर्यंतही जर पुरेसे लिखाण आले नाही तर ह्या वर्षी दिवाळी अंक काढणे अवघड होईल. तेव्हा सर्व मनोगती लेखकांनी लवकरात लवकर आपले लिखाण पाठवावे व अशी वेळ येऊन देऊ नये ही विनंती.
- अंक समिती