kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:

त्या बिचाऱ्या क्लिओपात्राचे थडगे उपसायला सुरुवात व्हायच्या आतच आता काही इतिहास संशोधकांची नजर शेक्सपियरच्या समकालिनांच्या ‘समाधीं’कडे लागली आहे. क्लिओपात्राचा मृत्यू २०३८ वर्षांपूर्वीचा. तिच्या मृत्यूबद्दलचे गूढ आहे, ते ती कशामुळे मरण पावली याबद्दलचे. खून की आत्महत्या? तिने स्वत:ला नागदंश करून घेतला, की विष प्राशन केले? आणि अर्थातच ती एक मदनिका होती, की सर्वसामान्य रूपाची राणी- याचा शोध ते इतिहासकार घेणार आहेत. शेक्सपियरबद्दलची इतिहासकारांची ‘डिटेक्टिवगिरी’ वेगळ्या स्वरूपाची आहे. गेली शे-दोनशे वर्षे काही साहित्य-इतिहास संशोधक असे मानत आले ...
पुढे वाचा. : ‘यू टू स्कॉलर्स!