स्त्री भृण हत्या योग्य की अयोग्य या बद्दल काही म्हणण्या पूर्वी कोणतीही भृणहत्या (गर्भपात) योग्य की अयोग्य हेही ठरवले पाहिजे. उठसूठ केलेली भृणहत्या ही अयोग्यच असे म्हणता येईल नाही का?
आता स्त्री भृण हत्येविषयी.
उपरोक्त लेखानुसार, जर निसर्ग आपला समतोल साधून घेत असेल, तर स्त्रीभृण हत्येत गैर ते काय? निसर्ग बघून घेईल की काय ते! आणि थोडा जर अधिक विचार केला, तर स्त्रीयांचे प्रमाण कमी असेल, तर लोकसंख्या वाढीस आपोआप आळा बसेल नाही का? कमी पुरुष अधिक स्त्रीया (आणि त्यातून येणारे बहुपत्नित्व) या पेक्षा कमी स्त्रीया आणि अधिक पुरुष (आणि त्यातून बहुपतित्व येत असेल तर) कमी मुलांना जन्माला घालू शकतात. त्यामुळे निसर्ग किंवा जैविक समतोल याची कोणीही चिंता करण्याचे काहीही कारण नाही.
मुख्य प्रश्न हा सामाजिक आहे, जर पुरुषांचे प्रमाण वाढले, तर मग कमी असलेल्य स्त्रीयांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढेल का? तसे होणार असल्यास त्या कारणासाठी स्त्रीभृणहत्या (आणि वर म्हटल्या प्रमाणे काही विशेष कारण नसतान केलेली भृणहत्या) टाळली पाहिजे.
आपणास काय वाटते?
मन्दार.