मिलिंदराव,
सप्रेम नमस्कार
दिलखुलास प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. लोभ आहेच़; असाच राहू द्यावा.
.......................
उलगडणे, उकलणे असेही अर्थ उगवणे या शब्दाचे आहेत. हा शेर लिहिताना मला दोन अर्थ अभिप्रेत होते.
.......................
पहिला म्हणजे- हा वर दिलेला. मी इतक्या सहजासहजी उलगडला जाईन, उकलेन याची तू खात्री बाळगलेली आहेस (पण मी तसा मुळीचच नाही)...मग हे आव्हान तू का पेलले आहेस ? कशासाठी ?
दुसरा म्हणजे - तू म्हणशील ती पूर्व दिशा असेलही...तुझ्या दुनियेत. पण तुझ्या त्या पूर्व दिशेला मीही उगवून येईन, याची खात्री तू कोणत्या आधारावर बाळगली आहेस ? (तसे काहीही कधी होणार नाही. एखादी गोष्ट पडल्याशिवाय तुझ्या 'हो'त 'हो' मी भरणार नाही) मग तू हे आव्हान कशासाठी (व्यर्थ) पेलले आहेस ?
हे दोन अर्थ सांगण्याचा प्रयत्न मी या शेरातून केला आहे.
धन्यवाद आणि पुन्हा एकदा आभार.