निसर्ग समतोल राखतो हे विधान गृहीत धरले तरीही (व्यक्तिशः माझा त्यावर विश्वास आहे ) केवळ पुढच्या वर्षी जास्त मुली जन्माला येतील म्हणून आत्ता गर्भात मुलींची हत्या करू नये ही कारणमीमांसा विचित्र आहे.
तसेच, एखाद्या वर्षी एखाद्या लिंगाचे मरण्याचे प्रमाण जास्त असणे यात 'ती व्यक्ती जन्माला आल्यानंतर काही कारणाने मेली' याची सांख्यिकी असावी, गर्भात मेलेल्यांची गणना त्यात नसणार अशी माझी खात्री आहे. (म्हणजे, गर्भात मेलेल्यांची संख्या निसर्ग समतोल राखताना विचारात घेत असेल असे वाटत नाही. )
सरकारने मध्यंतरी एक कायदा काढला होता की दांपत्य एका व पहिल्या मुलीनंतर जर थांबले (ऑपरेशन करून घेतले ) तर त्यांना दहा हजार रुपये मिळतील. आमच्या जुन्या घराजवळ राहणाऱ्या एकांनी असे केलेले होते.