हा विश्वसनीय आणि त्या विषयांवरील तज्ञांकडून मान्यताप्राप्त असावा. हा विषय शरीरशास्त्र, पुनरुत्पादनशास्त्र तसेंच मानववंशशास्त्र संबंधी असावा.
एडवर्ड डी बोनो हा लेखक त्या शास्त्रातील पारंगत व्यक्ती आहे असें मानूं. तरी कधीं कधीं थोर माणसें पण साध्या चुका करतातच. न्यूटननें नाहीं कां मांजर व पिल्लासाठीं वेगळीं भोकें पाडलीं. थोडक्यात म्हणजे विधान कोणीही केलेलें असलें तरी तें तर्काच्या, परीक्षेच्या आणि प्रयोगाच्या कसोटीवर पारखून घ्यायला पाहिजे. केवळ पाश्चीमात्य विद्वान झाला म्हणून तो बरोबर हें साफ चुकीचें आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे हा निष्कर्ष आंकडेवारीवर वा संख्याशास्त्रावर आधारित आहे. १९७३ सालीं त्या बोनो साहेबांना कोणती आंकडेवारी उपलब्ध होती असेल? शेवटीं हें अनुमान आंकडेवारीवर आधारित आहे आणि आंकडेवारी ही फसवी असूं शकते हें विसरतां कामा नये. उदा अंड्यामुळें हृदयरोग बळावतो असा एक संख्याशास्त्रीय निष्कर्ष आहे. अंडीं उत्पादकांनीं बरोबर त्याविरुद्ध संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढलेला आहे. आपण कशावर विश्वास ठेवायचा हें आपल्या हातांत असतें.
असो. पण भ्रूणहत्या वाईटच. खरें तर मूल जन्माला घालण्याअगोदर तें मुलगा वा मुलगी जसें असेल तसें स्वीकारायची तयारी असावी. नाहींतर जन्माला घालूंच नये. अर्थात हें माझें मत आहे, इतरांचीं मतें वेगळीं असूं शकतात आणि माझ्यापेक्षा भिन्न मतांचा आदर मीं करतों.
सुधीर कांदळकर.