प्रदीपराव,
'उगवणे' ह्या शब्दाचे उलगडणे, उकलणे हेही अर्थ असतात हे खरे आहे. पण तुम्ही जी वाक्यरचना वापरली आहे त्यानुसार ते लागू होऊ शकतात का?
उगवून मी येईन ही खात्री तुला...?
आव्हान हे का पेलले आहेस तू ?
- "उगवून मी येईन" हा बोलणाऱ्यासाठी ऍक्टिव वॉइस व 'ति'च्यासाठी पॅसिव वॉइस होतो. 'उलगडून/उकलून मी येईन तुला' असे म्हणाल्याने तुम्हाला अभिप्रेत अर्थ निघत नाही. त्यासाठी 'उगवेन मी तुला' (पक्षी : उलगडेन/उकलेन मी तुला) असे वाक्य योजावे लागेल. इथे 'येईन' शब्द आल्याने अर्थ बदलतो, सूर्य/चंद्र/तारे उगवतात तसा अर्थ निघतो. तसेच 'आव्हान' शब्द वापरल्यानंतरही 'उगवून मी येईन' ची सांगड जोडता येत नाही. निवेदकाला 'उगवणे/उकलणे/उलगडणे' हे तिच्यासाठी आव्हान असू शकते कारण त्यात तिने काहीतरी ऍक्टिव्हली करणे अभिप्रेत आहे. पण निवेदकाच्या आपसूक उगवून येण्यात तिला काय आव्हान ? निवेदकाचे 'उगवून येणे' तिचा काहीही हातभार लागल्याविना / सहभाग असल्याशिवाय घडणारी गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही हे जे दोन अर्थ सांगितले आहेत ते तुम्हाला अभिप्रेत असले तरी तुमच्या वाक्यरचनेतून प्रतीत होत नाहीत.