'आहेस तू' ही रदीफ घेतल्यानंतर, कवीला अत्यावश्यकपणे 'असा आहेस तू' किंवा 'असे केले आहेस तू' (अर्थातच, अशी आहेस तू हेही समाविष्ट) याच ढंगाचे कवाफी घ्यावे लागणार.
(आधीच लिहितो, विशिष्ट कवाफी व रदीफ घेऊन 'गजल' रचण्याची इच्छा असणे माझ्यामते अनैसर्गीक असून श्री. प्रदीप कुलकर्णी यांना तर तसे करायची निश्चीतच गरज नसणार हे मी जाणतो. )
पण, अशी रदीफ घेतल्यानंतर 'तू कसा / कशी चुकलास /चुकलीस, वाईट वागलास / वागलीस, माझ्या नादाला लागलास / लागलीस, मला शोधत बसलास / बसलीस यापलीकडे द्विपदीचा आशय जाऊच शकत नाही.
(किंवा, तू कसा / कशी बरोबर होतास / होतीस अन मी कसा चुकलो, यापलीकडे)
तेव्हा, याचा माझ्यामते अर्थ असा निघतो की कवीला 'तू कसा आहेस व मी कसा आहे' या पलीकडे सदर गजलेत काहीही सांगायचे नाही.
प्रत्येक द्विपदी स्वतंत्रपणे वाचली ( जसे गजलेबाबत अपेक्षितच असते ) तर प्रत्येक द्विपदीतील 'तू' कोण आहे याचा अंदाज बांधत बसावा लागतो.
मज, तुज या शब्दांचा वापर शुन्य असावा असे मला म्हणावेसे वाटते. मज, तुज या शब्दांमुळे उगीचच कृत्रिम काव्यात्मकता येते व 'मला, तुला' मधील सरळपणा नष्ट होतो.
एकंदर, शेकडो (मराठी / अमराठी ) गजला जर वाचल्या, तर ही रचना 'गजलच नाही; हे पटायला हरकत नाही, असे मी म्हणतो.
आभार!