मराठी लिहीतांना शुद्धलेखनात भरपुर चुका होत आहेत, ते टाळण्याचा काय उपाय आहे? मदत हवी आहे.

ह्यावरून चुका जाणून घ्यायची आणि त्या सुधारायची तुमची इच्छा आहे अशी माझी समजूत झालेली आहे.

अरे देवा! .....मदत अंजनच ठरले.   आभार..... शतशः आभार...... बरोबर लिहिले कां?

तुमचा वरचा प्रतिसाद उपरोधात्मक नसून 'अरे देवा' असे म्हटल्यावरून तुम्हाला दुःख झाल्यासारखे मला वाटते. तुम्हाला चुका झाल्याचे दुःख झाले की चुका दाखवल्याचे दुःख झाले हे मला समजून घ्यावेसे वाटते. शक्य झाल्यास कृपया माहिती द्यावी म्हणजे त्यानुसार तुम्हाला शक्य तेव्हा साहाय्य करावेसे वाटेल. धन्यवाद.