तेव्हा, याचा माझ्यामते अर्थ असा निघतो की कवीला 'तू कसा आहेस व मी कसा आहे' या पलीकडे सदर गजलेत काहीही सांगायचे नाही.
असे वरील प्रतिसादकाला वाटत असले तरी मला असे वाटले नाही.  हे आकलन पूर्वग्रहदूषित आहे की काय?

मज, तुज या शब्दांचा वापर शुन्य असावा असे मला म्हणावेसे वाटते. मज, तुज या शब्दांमुळे उगीचच कृत्रिम काव्यात्मकता येते व 'मला, तुला' मधील सरळपणा नष्ट होतो.

मज, तुज एक-दोनदा आल्यास काही ब्रह्मपातक होत नाही. मला, तुला सध्याचे वळण आहे. त्यात सरळपणाचे काय घेऊन बसला आहात.

प्रत्येक द्विपदी स्वतंत्रपणे वाचली ( जसे गजलेबाबत अपेक्षितच असते ) तर प्रत्येक द्विपदीतील 'तू' कोण आहे याचा अंदाज बांधत बसावा लागतो.
ह्यात काही गैर आहे काय? अर्थ पोचतो आहे ना?

कवाफी व रदीफ

'काफिया' चे अनेकवचन 'कवाफी' आहे. पण उर्दूत! (गझलेच्या बाराखडीत माहिती म्हणून तो शब्द दिला आहे.) मायमराठीत मात्र काफियाचे अनेकवचन मराठी वळणानेच करायला हवे. काफिये म्हणायचे! नाहीतर यमक, अन्त्ययमक, द्विपदी हे शब्दही रूढ आहेतच. शिवाय, मतल्यासाठीही मथळा आहेच.

एकंदर, शेकडो (मराठी / अमराठी ) गजला जर वाचल्या, तर ही रचना 'गजलच नाही; हे पटायला हरकत नाही, असे मी म्हणतो.

हे केवळ खुद्द प्रतिसादकाला पटले तरी खूप झाले!