विस्तव हा संस्कृत वैश्वानर(=अग्नि)पासून बनला. स्टोव्ह इंग्रजी शब्द. अर्थ: सरपण, कोळसा, तेल किंवा अन्य जळाऊ पदार्थ जाळून घर उबदार करावयाचे किंवा स्वयंपाकासाठी वापरायचे उपकरण. कोळशाच्या, भुश्श्याच्या वा गॅसच्या स्टोव्हला आपण मराठीत शेगडी म्हणतो.
अवांतरः गुजराथीत स्टोव्हला त्याच्या संशोधकाच्या नावाने ओळखतात आणि प्रायमस म्हणतात. इंग्रजी स्टोव्हची व्युत्पत्ती डच भाषेतील Stoof पासून आहे.