महाराष्ट्रासारख्या आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेल्या राज्यात मुलींचे प्रमाण दरहजारी ९०० ते ९४३ च्या दरम्यान आहे याचे कारण स्त्रीभ्रूण हत्येचे वाढते प्रमाण.पंजाबमध्ये तर २००५ च्या मे महिन्यात काही खेड्यात हे प्रमाण हजार नुलांमागे ५०० किंवा त्याहूनही कमी मुली इतके खाली गेले होते आणि त्याला कारण गर्भाचे लिंग अगोदर सोनोग्राफी वा तत्सम तपासणी करून निश्चित करायचे आणि तो स्त्रीलिंगी असेल तर गर्भपात करून घ्यायचा.या गोष्टीवर आळा घालण्याचा प्रयत्न कृष्णकुमार या डॅप्युटी कमिशनरनी केल्यावर ते प्रमाण १०००:९२५ इतके वाढले
निसर्ग समतोल राखो अथवा न राखो अशा प्रकारे आपल्याच जन्मास येऊ घातलेल्या अपत्याची हत्या कितपत समर्थनीय आहे ?एकीकडे इच्छामरणाचा कायदा त्याचा दुरुपयोग होईल या भीतीने करायचा नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीने होणाऱ्या राजरोस हत्येकडे दुर्लक्ष करायचे हा कुठला न्याय ?