भ्रमंती,
स्त्रियांची संख्या कमी असेल तर लोकसंख्येला आळा कसा काय बसेल? तुमच्या म्हणण्याप्रमाणे बहुपतित्व अस्तित्वात आले तर एक स्त्री अनेक पुरुषांच्या (नवऱ्यांच्या) मुलांना जन्म देईल. कोणतीही हत्या ही वाईटच. पण सध्या 'स्त्री भृणहत्येची ' जास्त चर्चा चालू आहे. म्हणून मी हा विचार मांडला. आज समाजशास्त्रज्ञ जी ओरड करत आहेत किंवा दर पुरुषांमागे कमी होणाऱ्या स्त्रियांची जी आकडेवारी दाखवली जात आहे ती भयावह आहे असे तुम्हाला वाटत नाही का? किंवा हा प्रश्न जो पर्यंत आपल्या दाराला येऊन भिडत नाही तो पर्यंत आपण काही करायचे नाही? काही वर्षांनंतर आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना विवाहासाठी मुलगी मिळणार नाही. पण आपल्याला काय त्याचे? तेव्हा आपण कुठे असणार? आपले तर झाले मग इतरांशी आपल्याला काय करायचे? ही विचारसरणी योग्य आहे का?
(काही भाग वगळला. : प्रशासक)