आजही भारतीय समाजात निरक्षरतेच प्रमाण जास्त आहे आणि जे काही साक्षर आहेत ते सुद्धा मुलगा व्हावा म्हणून गर्भाचे लिंग अगोदर सोनोग्राफी वा तत्सम तपासणी करून निश्चित करतात आणि तो स्त्रीलिंगी असेल तर गर्भपात करून घेतात. यात बदल होण्यासाठी समाजात स्त्रीभ्रूण हत्येविषयी जागरूकता र्निमाण करणे जरुरी आहे. या साठी तुम्हा आम्हा सर्वाचे सहकार्य हवे. प्रत्येकाने आपापल्या कुटुंबात जागरूकता र्निमाण केली तरी बरंच काही साध्य होईल.