चौकस यांचे लेखन मलाही आवडते. पण इथे लिहिणारे बहुतांश लेखक व्यावसायिक लेखक (जसे नियतकालिकामध्ये लिहिणारे) नसून हौशी लेखक आहेत. त्यामुळे लिखाणात अधूनमधून खंड पडणे साहजिक(आणि अपेक्षित) आहे. चौकसरावांची  वाटचाल पाहिली तर  इथे लिहायला सुरूवात केल्यापासून त्यांच्याही वाटचालीमध्ये असे लिखाणरहित कालखंड आहेत असे दिसून येईल. त्यामुळे चौकसरावांचे दर्जेदार लेखन पुन्हा लवकरच वाचायला मिळेल अशी खात्री वाटते.