वांग्याच्या चकत्या (साधारण ०.७५ सें. मि. जाड ) केल्यावर , त्याला उभे काप वरचे-वर द्यावेत. गरम मसाला / कांदा-लसूण मसाला + मीठ एकत्र कालवून घ्यावे. मग वांग्याच्या चकत्यांना हे चोळून, तेल सोडून दोन्हीकडून तव्यावर खरपूस भाजावेत. अतिशय रुचकर लागतात. आमच्याकडे (घरी) ह्याला "वांग्याचे चॉप्स" म्हणतात.