अळुपिष्टन साहेब म्हणजे पुण्यातील मुळा-मुठेच्या संगमावरचा साहेब. माउन्ट्स्टुअर्ट एल्फ़िन्स्टन(जन्म१७७९ मृत्यू लिंप्सफ़ील्ड(सरे) येथे १८५९). स्कॉटिश कर्नल, प्रशासक आणि इतिहासतज्ज्ञ. बंगालच्या प्रशासनामध्ये १७९५ मध्ये दाखल. लॉर्ड वेल्स्लीच्या अधिपत्याखाली असायेच्या लढाईत(१८०३) उत्तम कामगिरी केल्यामुळे १८०८ मध्ये नागपूरचे निवासी अधिकारी झाले. १८०८ मध्ये काबूलला राजप्रतिनिधी आणि १८१० मध्ये पुणे येथे रेसिडेन्ट. १८१८ मध्ये पेशवाई खालसा करून अळुपिष्टनसाहेब मुंबईचे गव्हर्नर(१-११-१८१९) झाले, ते थेट १-११-१८२७ पर्यंत. एल्फ़िन्स्टन इन्स्टिट्यूट, एल्फ़िन्स्टन हायस्कूल आणि  एल्फ़िन्स्टन कॉलेज ह्या संस्था ते इंग्लंडला परतल्यानंतर त्यांचे नाव देऊन स्थापन झाल्या. भारताचा गव्हर्नर जनरल होण्याची संधी मिळत असताना ती नाकारून त्यांनी आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य लेखना-वाचनात शांतपणे व्यतीत केले. हिस्टरी ओफ इंडिया(१८४१) आणि राइज़ ऑफ ब्रिटिश पॉवर इन द ईस्ट(१८८७) ही त्यांनी लिहिलेली पुस्तके. महाराष्ट्रावर आणि मराठी व गुजराथी भाषांवर त्यांनी अतोनात प्रेम केले आणि आजचा शैक्षणिकदृष्ट्या पुरोगामी महाराष्ट्र जन्माला घातला.

मुंबई शहरातील एल्फ़िन्स्टन सर्कल, एल्फ़िन्स्टन रस्ता(हल्लीचा जगन्नाथराव भातणकर मार्ग) आणि एल्फ़िन्स्टन रोड रेल्वे स्टेशन ही, २६-१२-१८५३ ते ११-५-१८६० या कालावधीत मुंबईचा गव्हर्नर असलेल्या लॉर्ड जॉन एल्फ़िन्स्टन या गव्हर्नरच्या नावाने आहेत, ही श्री. टग्या यांनी दिलेली माहिती अचूक आहे. हा गव्हर्नर(माउन्ट्स्टुअर्टचा पुतण्या)देखील त्याच्या कार्यामुळे लोकप्रिय होता. त्याच्या निवृत्तीसमारंभात नाना शंकरशेठ, डॉ.भाऊ दाजी लाड, आणि नवरोजी फर्दुनजी भरभरून बोलले असे वाचले आहे.

दोघांची मुंबईतली निवासस्थाने परळला होती.