मायमराठीत मात्र काफियाचे अनेकवचन मराठी वळणानेच करायला हवे. काफिये
म्हणायचे! नाहीतर यमक, अन्त्ययमक, द्विपदी हे शब्दही रूढ आहेतच. शिवाय,
मतल्यासाठीही मथळा आहेच.
हे विधान कुठल्या आधारावर आहे? मुळात जर काफिया हा शब्दच मराठीत नाही तर काफिये तरी का म्हणायचे?
आपल्या मुद्यातील भावना जरी समजत असली तरीही शैली अधिकाराची वाटली. दर दहा मैलांना भाषाच बदलते तर मायमराठी म्हणजे काय?
कुणी कशाला काय म्हणायचे इतपत स्वातंत्र्य इतरांना असावे अशी विनंती!
तसेचः
एका प्रकाशित गजलेबाबत एका रसिकाने केलेल्या मत'प्रदर्शनाला' पुर्वग्रहदुषित म्हणण्याचे स्वातंत्र्य अर्थातच कुणालाही आहेच, पण फक्त 'ही गजल उत्कृष्ट आहे' असेही मत देता आले असतेच खरे तर! असो!
सुखांची रास लाथाडून मी आलो कवी व्हाया
कुणी दुनियेत माझ्यासारखे शापीत आहे का?
- बेफ़िकीर