पण, अशी रदीफ घेतल्यानंतर 'तू कसा / कशी चुकलास /चुकलीस, वाईट वागलास / वागलीस,  माझ्या नादाला लागलास / लागलीस, मला शोधत बसलास / बसलीस यापलीकडे द्विपदीचा आशय जाऊच शकत नाही.

(किंवा, तू कसा / कशी बरोबर होतास / होतीस अन मी कसा चुकलो, यापलीकडे)

तेव्हा, याचा माझ्यामते अर्थ असा निघतो की कवीला 'तू कसा आहेस व मी कसा आहे' या पलीकडे सदर गजलेत काहीही सांगायचे नाही.

तुमच्या वरील विधानांना कुठलाही आधार नाही. काहीही सांगायचे नाही असे तुम्हाला वाटते आहे. एखाद्याला असे वाटण्यावर इतरांचे कुठलेही नियंत्रण असू शकत नाही. पण तुम्हाला असे का वाटले हे तुम्ही सांगितलेले नाही. तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे हे कळत नाही. म्हणूनच तुमचे हे बिनबुडाचे गाडगे पूर्वग्रहदूषित वाटते.

किंवा तुमची ही विधाने अज्ञानमूलकच असावीत. कारण गझल हा संवाद आहे. कधी स्वतःशी. कधी प्रेयसीशी. कधी प्रियकराशी. कधी मित्राशी. कधी देवाशी. कधी जगाशी. कधी जनांशी. मग त्यात मी आणि तू चे असणारच.

माझे बाराखडीचे आकलनच चुकीचे असल्यास क्षमस्व!
पेक्षाही तुम्ही बाराखडीचा उपयोग तुमच्या सोयीनुसार करता आहात की काय अशी शंका येऊ शकते.

वेळेअभावी तुम्ही वरील प्रतिसादात मांडलेल्या काहीच नव्या मुद्यांवर माझी मते थोडक्यात मांडतो.

चुपचाप तू ऐकून घे आता मला
मौनास माझ्या छेडले आहेस तू !
चुपचाप या शब्दात भांडण्याची छटा आहे. दटावण्याची छटा आहे. कवीने कुठलीही छटा आणावी. पण त्या छटेचे समर्थन व्हावे अशी अपेक्षा! दटावताना दटावण्याइतके काय झाले आहे हे बघायला गेल्यावर 'माझ्या मौनाला छेडलेस' ही ओळ येते. माझ्या मौनाला छेडलेस, आता गप्प बसून ऐकून घे - अशी ही द्विपदी आहे. यात एक असमर्थनीय दटावणी आहे असे 'वाटले'.

एक: चुपचाप या शब्दात केवळ भांडण्याची छटा नाही.
दोन: मला असमर्थनीय दटावणी !? तुम्हाला का वाटली बरे?  'छेडणे'सोबत 'चुपचाप ऐकून घेणे' योग्यच आहे. हा शेर म्हणजे चांगला 'शाब्दिक खेळ' (वर्ड  प्ले) आहे.

बाराखडी - गझलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी.
पुन्हा एकदा: बाराखडीचा उपयोग सोयीनुसार होतो आहे काय? तुमच्या मतानुसार गझलेच्या पिंडाला न मानवणारे काय आहे ते अवश्य दाखवावे. पण गरज नाही तिथे बाराखडीचे दाखले कशाला द्यायचे? सूर्य पूर्वेला उगवतो असे पुस्तकात लिहिलेले असते. ह्याचा अर्थ 'मी म्हणेन ती पूर्वदिशा' असा होत नाही.

असो. आता थांबतो.