तरंग येथे हे वाचायला मिळाले:

गेल्यावर्षी सुट्टीत आईकडे राहायला गेले होते तेव्हा भावाने फर्मान सोडलं--"ए, आता जरा आठ दिवस राहणार आहेस तर तुझं वह्या-पुस्तकांचं कपाट जरा बघ। नको असेल ते वेगळं काढ आणि मला जरा कपाटात जागा करून दे."

झालं, एका निवांत दुपारी मी कापाटाच्या आवरा-आवरीचं काम हाती घेतलं। दार उघडताक्षणी आठवणींचा खजिनाच उघडला जणू. शाळेपासूनच्या जपून ठेवलेल्या कितीतरी गोष्टी, तसंच जुन्या वह्या पुस्तकं असं बरच काही माझ्या हाती लागलं. काय ठेवावं काय टाकावं हे बघतानाच एकीकडे मी जुन्या वह्या चाळत होते. अशाच काही वह्या चाळताना जाणवलं की आपण केलेला अभ्यास ...
पुढे वाचा. : वहीचं पान-शेवटचं................