आपले स्तवन आवडले.
एक सुचवावेसे वाटते.
ईशू विद्येचा अवघ्या तूं । ह्यामध्ये ईशू मधील दीर्घ 'शू' कुठेतरी खटकल्यासारखा वाटला. म्हणजे, ज्ञानेश्वरीपासून जे काही 'उकारांत' शब्द रूढ झालेत, उदा; रुणुझुणु, अळुमाळु, इ. ते सगळेच बहुतेक ह्रस्व उकारांत आहेत, आणि ते कानाला गोड वाटतात. तसा हा शब्द वाटला नाही. चूभूदेघे.
वृत्तात येण्यासाठी 'शू' दीर्घ केला असावा असे वाटते.
उकारान्त शब्दाऐवजी, 'ईश्वर' हा शब्द वापरला, तर वृत्तालाही बाध नाही, आणि कानालाही छान वाटेल.
ह्या प्रतिसादाला कृपया छिद्रान्वेषण समजू नका. जे मनात आले ते लिहिले.
- चैतन्य.