गझल आवडली.
मीलनाचे गूज मी सांगू कसे, लाजेल ती
एव्हढे सांगेन, धुंदी आजही रेंगाळते
 हा शेर आणि त्याचा अनुवादित (अनूदित? ) शेर आवडले.
वस्ल चा नक्की अर्थ सांगितलात तर बरे होईल. (उर्दू बद्दल पूर्ण अंधार आहे म्हणून विचारतोय)

पारध्याचे नाव मी ओठी जरी ना आणले
जाणतो पण कोण पडद्याआडुनी डोकावते
ह्या शेराबाबत मात्र मला उर्दू शेर जितका प्रभावी आहे तितका हा नाही वाटला.
चिल्मन= पडदा कुठेतरी खटकते. (अर्थात मला चिल्मन चा अर्थही नीट ठाऊक नाही म्हणा, पण कधी कधी शब्द वाचूनच त्याची वेगळी छटा कळते, तसे काहीसे झाल्याने पडदा हा शब्द खटकला. चू. भू. दे. घे. )
आणि, पारधी आणि पडदा हा संबंधही तितकासा स्पष्ट वाटला नाही (मला तरी)

पुढील गझलेस अनेकोत्तम शुभेच्छा.