मायमराठीत मात्र काफियाचे अनेकवचन मराठी वळणानेच करायला हवे. काफिये म्हणायचे! नाहीतर यमक, अन्त्ययमक, द्विपदी हे शब्दही रूढ आहेतच. शिवाय, मतल्यासाठीही मथळा आहेच.

हे विधान कुठल्या आधारावर आहे? मुळात जर काफिया हा शब्दच मराठीत नाही तर काफिये तरी का म्हणायचे?

मूळ मराठी नसलेले हजारो अरबी व फारशी  शब्द मराठीत रूढ झालेले आहेत. ह्या शब्दांचे मराठीत अनेकवचन करताना आपण उर्दूप्रमाणे फारशी व अरबीचे कायदे लावत नाही. मराठीतले फारशी-अरबी शब्द काढावे आणि त्यांची मराठी अनेकवचने कशी होतात ते 'अभ्यासोनी प्रगटावे.' तुम्हाला असंख्य उदाहरणे सापडतील.

मी अधिकारवाणीने बोलतो आहे असे तुम्हाला वाटले त्याबद्दल क्षमस्व. मी माझ्या पदरचे काहीही सांगत नाही आहे.


कुणी कशाला काय म्हणायचे इतपत स्वातंत्र्य इतरांना असावे अशी विनंती!

इथे कुणी कुणाच्या तोंडात बोळा टाकलेला आहे? कुणी कशाला काहीही म्हटले आहे असे वाटल्यावर गप्प न बसण्याची मुभाही इतरांना असावी अशी विनंती!



१. उर्दूतही सगळेच जण किंवा सगळ्याच ठिकाणी अनेकवचन करताना फारशी व अरबीचे कायदे वापरत नाहीत. उर्दूत फौजें आणि अफवाज दोन्ही लागू आहे.
२.काहीच उदाहरणे:
मराठीत वजनचे अनेकवचन वजने होते. औजान होत नाही.
मराठीत हालचे अनेक हालच होते. अहवाल हा शब्द मराठीत असला तरी तो हालचे अनेकवचन म्हणून वापरला जात नाही. त्याचे अहवाल झाले असे आम्ही म्हणत नाही.
मराठीत खर्चचे अनेकवचन खर्चच होते. अखराजात होत नाही.
मराठीत फौजचे अनेक वचन अफवाज होत नाही.
मराठीत उस्ताद/वस्तादचे अनेकवचन उस्ताद/वस्तादच होते. असातिजा होत नाही.
मराठीत खबरचे अनेकवचन अखबार होत नाही.