ऐतिहासिक आणि पौराणिक व्यक्तींचा उल्लेख एकवचनी करायचा असा संकेत आहे. त्यामुळे शिवाजीचा उल्लेख प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजीमहाराज असा करावयास माझा विरोध आहे. प्रत्येक व्यक्तीला नामबिरुदांनी सजवायचे अशा आपल्या मरहट्टी दुराग्रहामुळे आमच्या गावातल्या ज्ञानेश्वर उद्यानाला लोक एस्डी उद्यान, तुकाराम उद्यानाला एस्टी उद्यान आणि व्ही.टी.ला छशिट म्हणतात. जो रस्ता पूर्वी शिवाजी रोड होता तो आता सीएस्टीएम मार्ग झाला आहे. मग म्हणायचेच असेल तर असेल तर गोब्राह्मणप्रतिपालकछत्रपतीश्रीशिवाजीमहाराज असे सुटसुटीत नाव घ्यावे.
दुसरेः शिवाजीच्या प्रेरणेने झालेल्या राज्यव्यवहार कोशाचा कर्ता रघुनाथ पंडित नसून तंजावरचा ढुंढिराज व्यास हा आहे. सेतु माधव पगडींच्यामतेमात्र तो कोश रघुनाथ नारायण हणमंते(रघुनाथ पंडित) यांचाच. हा कोश फार्सी-मराठी नसून दख्खनीयावनी(उर्दू)-संस्कृत आहे. त्यातल्या १३८० शब्दांपैकी फारतर दहा टक्के शब्द मराठीत अजूनही प्रचलित आहेत.