मिलिंदजी,
सर्वप्रथम गझल नेहमीप्रमाणे भरजरी,नक्षीदार!
मूळ गझलेतील 'कातिल'चा इथे "पारधी" झाला आहे. खरंतर अर्थाच्या दृष्टीने 'पारधी'चा  'सैंयाद'शी जास्त मेळ बसतो!
१) त्या ऐवजी,
त्या खुन्याचे नाव मी ओठी जरी ना आणले
जाणतो पण कोण पडद्याआडुनी डोकावते.... कसे वाटते? प्रेयसीला 'कातिल' अर्थात 'मारेकरी,खुनी' असे संबोधणे नवीन नाही.
२) जर फक्त प्रेयसीच अभिप्रेत नसेल तर,
गारद्याचे नाव मी ओठी जरी ना आणले
जाणतो पण कोण पडद्याआडुनी डोकावते.... असे केल्यास शेरास आणखी वेगळा(च) अर्थ येऊ शकतो.
(चू भू दे घे)
जयन्ता५२