शैलेंद्र यांची एकाहून एक अप्रतिम गाणी ऐकून होतो, परंतु त्यांच्या ह्या परिचयाचा आस्वाद घेउन विशेष आनंद झाला. चित्रपटातली शैलेंद्र यांची गाणी आणि त्यातील काव्य यासंदर्भातील रोचक विवेचन व त्याचबरोबर इतर माहिती वाचून खूप छान वाटलं. युट्युब वरील दुव्यांमुळे ही अप्रतिम गाणी ऐकण्याची सोयही झाली आणि आनंद द्विगुणीत झाला. अतिशय छान लेख आहे हा!