जयन्तराव, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

मूळ गझलेतील 'कातिल'चा इथे "पारधी" झाला आहे. खरंतर अर्थाच्या दृष्टीने 'पारधी'चा  'सैंयाद'शी जास्त मेळ बसतो!
१) त्या ऐवजी,
त्या खुन्याचे नाव मी ओठी जरी ना आणले
जाणतो पण कोण पडद्याआडुनी डोकावते.... कसे वाटते? प्रेयसीला 'कातिल' अर्थात 'मारेकरी,खुनी' असे संबोधणे नवीन नाही.

प्रेयसीला कातिल ही उपमा उर्दू काव्यात वापरली जात असली तरी मराठीत तिला खुनी म्हणण्याचा रीवाज नाही. खुनी या शब्दास मराठीत ठराविक रूढार्थच आहे. आपण ’तिने मला नजरबाणाने घायाळ केल" असे म्हणतो, ’तिने माझी शिकार केली’ असेही म्हणतो पण"तिने माझा खून केला’ असे किंवा"ती सुंदर खुनी आहे’ (खूबसूरत कातिल)  असे शब्दप्रयोग सहसा वापरत नाही. निदान माझ्या वाचनात तरी ते आलेले नाहीत. ’खुनी’, ’मारेकरी’ हे शब्द प्रेयसीबद्दल मायमराठीत विचित्र वाटले असते म्हणून वापरले नाहीत. हा मुद्दा, माझ्या मते, शब्दार्थापेक्षा दोन भाषांच्या भिन्न प्रकृती व अभिव्यक्तीचा आहे.