विखुरलेले मोती येथे हे वाचायला मिळाले:

दा विंची कोड ही डॅन ब्राऊनची सुप्रसिद्ध कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल किंवा तिच्याबद्दल ऐकले असेल. काही प्राचीन रहस्यांचा शोध, ऐतिहासिक रहस्यांचा पाठपुरावा आणि काही प्राचीन गुप्तसंस्थांचे कामकाज असा साचा डॅन ब्राऊनच्या कादंबर्‍यांत सहसा आढळून येतो. दा विंची कोडमधील प्रायॉरी ऑफ झायन आणि एंजल अँड डिमन्स या दुसर्‍या कादंबरीतील इल्युमिनाती या गुप्तसंस्था या कादंबऱ्यांचा गाभा आहेत. एंजल्स अँड डिमन्स मधील एका प्रसंगात, कादंबरीची नायिका वित्तोरिया वेत्रा, रॉबर्ट लॅंग्डनला विचारते की "तू प्राचीन चिन्हशास्त्राकडे कसा काय वळलास? " याचे उत्तर ...
पुढे वाचा. : एक डॉलरचे रहस्य