भात करतांनाची तारांबळ मस्त. अंगतपंगतीची कल्पनाही छान. आम्हीं देखील मित्र मित्र कधींतरी जमून बाहेरगांवीं जाऊन कांहींतरी शिजवून खातों. दोघेजण शाकाहारी स्वयंपाक चांगला करतात. एकजण मासे उत्कृष्ट भाजतो. दोघे सुरेख ड्रायव्हिंग करतात (यांत वरील स्वयंपाक जमणारा एक) आणि यांपैकीं कांहींही न येणारा एकजण स्वयंपाकघराची साफसफाई छान करतो. (त्याला साधनाताई आमटे हें नांव ठेवलें आहे)  

पण आतांची मध्यमवर्गीय पिढी, खासकरून नोकरी करणाऱ्या आयांचीं बहुतेक मुलें थोडाफार स्वयंपाक करूं शकतात.

छान लेखाबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर.