खरेंच मुंबैचे लोकलचे पुरुष प्रवासी सुद्धां मस्त जिंदादिल असतात. डिसें २००५ मध्यें अंधेरी स्टेशनाम्त पाय घसरून पडून माझा पाय दुखावला आणि चालायला वगैरे खूप त्रास व्हायचा. वयामुळें ठीक व्हायला दीड एक महिना लागला. पण सकाळीं ८.३५ च्या मालाड लोकलमधल्या माझें नांवगांवही माहीत नसलेल्या गुजराथी तरूणांच्या टोळक्यानें मला त्या काळांत मला 'अंकल संभालो, आरामसे आना' करून व्यवस्थित मालाड ते अंधेरी सांभाळून नेलें.
हॅटस ऑफ मुंबै लोकलप्रवासी
सुधीर कांदळकर.