सर्वच सन्स्था या हिंदू कुटुंब पद्धती सारख्याच असतात. हिंदू कुटुंब पद्धती मध्ये दोन सत्ताकेंद्र असतात. एक स्वैपाकघरात एक बाहेरच्या घरात. आज घरात तुरीचे वरण करायचे कि मुगाच्या डाळिचे हा निर्णय बायकानी घ्यायचा तसेच शेतात तुर पेरायची कि मुग हा निर्णय पुरुषानी घ्यायचा.  दोन्ही सत्ताकेंद्राना समान महत्त्व आहे आणि दोघेही आपापल्या अधिकार कक्षेत ढवळाढवळ न करिता कार्यरत राहणे हे या सन्स्थेचे वैशिष्ट्य. जरी डाळी एकच असल्या तरी निर्णय घेणे हे - " जेणू काम तेणू थाय बिजा करे सो गोता खाये" या गुजराथी म्हणी प्रमाणे ज्याने त्यानेच आपल्या अधिकार कक्षेतच निर्णय घ्यावा हे उचित.

आपल्या कंपनीमध्ये जे चालले आहे ते माझ्या मते चांगले चालले आहे. निर्णय घेणे, उचीत निर्णय घेण्याची क्षमता असणे या पेक्षा इतरानी घेतलेल्या निर्णयाचा मान राखणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आज काल घरोघरी रोजची भाजी लहान मुलाना विचारून करण्याची पद्धत रुढ झाली आहे चुक बरोबर हि गोष्ट वेगळी पण घेतल्या निर्णयास मान देणे हे नवीन पिढी शिकू शकत नाहि.

माझ्या मित्राच्या घरी शेती आहे पण तो म्हणाला मि शेतात फक्त गमत बघायला जातो, कधिही सल्ला देत नाही वा ढवळाढवळ करित नाही कारण भावाशी मतभेद होण्याची शक्यता आहे.  सबब तो जे करतो ते मला मान्यच आहे.