सुरेख जमलेला लेख. वर्णने उत्तमच.  ही अंगतपंगत खरोखरच निवृत्तांना आनंद मिळवून देते. माझे वडीलही त्यांच्या १०-१२ मित्रांबरोबर दर महिन्याला गावाबाहेरील एखाद्या रम्य ठिकाणी जाऊन अशी अंगतपंगत करतात.   पण पदार्थ स्वतः बनवत नाहीत. माझे बाबा उत्तम स्वयंपाक करत असल्यामुळे फक्त तेच स्वतःचा पदार्थ बनवून नेतात. वरची कल्पना मी त्या सगळ्यांनाही सुचवेन, जेणे करून त्यांचा आनंद द्विगुणित होईल.

वर कुणीतरी उल्लेख केला म्हणुनच केवळ तुम्ही इथे नवे आहात हे समजले. लिखाण अगदी सराईतासारखे आहे. त्याचे विशेष कौतुक.