नीता ताई,
 विचारांची योग्यायोग्यता ही कोणत्यातरी संदर्भात ठरते.
बहूपत्नित्व असेल तर, त्या कुटुंबाला एकाच वेळेस अनेक अपत्ये होऊ शकतात. बहुपतित्व असल्यास तेवढीच अपत्ये होण्यास बराच जास्ती कालावधी लागेल. आणि त्यामुळेच लोकसंख्या वाढीस आपोआप चाप बसेल. तर, निसर्ग या दृष्टीने विचार केल्यास स्त्री भ्रूणहत्या योग्य किंवा अयोग्य काहीच नाही.
    स्त्रीभ्रूणहत्या योग्य की अयोग्य हे ठरवतान सामजिक संदर्भ वापरणे आवश्यक आहे. मी वर लिहिल्या प्रमाणे स्त्रीयांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी झाल्यास त्यातून जर सामजिक समस्या निर्माण होणार असतील (उदा. बहूपतित्वास परवानगी न दिल्यास अनेक पुरुषांना अविवाहित राहावे लागणे आणि त्यातून स्त्रियांवरिल अत्याचारांत वाढ होणे किंवा परवानगी दिल्यास, अश्या कुटुंबांच्या आत्ता आपल्याला महित नसलेल्या समस्या निर्माण होणे) तर स्त्रीभ्रूण हत्या अयोग्यच आहेत. (आणि वरील समस्या निर्माण होतील यातही काही दुमत असण्याचे कारण नाही).
पण निसर्गाचा समतोल वगैरे सांभाळत बसायची काही आवश्यकता नाहि, निसर्गाकडे ती व्यवस्था आहे.
स्त्री पुरुष प्रमाण बदलणे हे भयावह का आहे? हे नीट लक्षात घेतले पाहीजे. आणि तेच कारण सर्वांना समजावून दिले पाहीजे.