डॅम्ड फ़ूल, डॅम्ड पुअर एक्सक्यूज यांमध्ये वापरला गेलेला शब्द Damned(अर्थः अगदी)  हा आहे. त्यामुळे डॅम्‍बिस. डामरट, डांबरट या शब्दांतला मूळ शब्द असलाच तर, डॅम्ड असला पाहिजे, डॅम नाही!  परंतु त्यातला अंत्य ड अनुच्चारित नाही.   त्यामुळे डॅम्ड बीस्ट किंवा डॅम्ड ब्रूट(ब्रॅटपेक्षा ब्रूट असण्याची शक्यता जास्त) यांचे मराठीकरण होताना हा 'ड' कुठे जातो?  बहुधा हे शब्द ज्यांनी मराठीत आणले त्या मराठी माणसांना 'ड' ऐकू आला नसावा.--अद्वैतुल्लाखान