Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
सुधाची बायको-शालिनी फक्त नावाचीच शालिनी. देखणेपणाचा व माहेरच्या सधनपणाचा तोरा सतत मिरवत राहते. आई व कुसुम या दोघींवर सुधाचा अतोनात जीव. शालिनी आली त्यावेळी कुसुमही शाळेत नोकरीला लागली होतीच. त्याच शाळेत शालिनीलाही प्रायमरी टीचरची नोकरी मिळत होती. अगदी कसलेही कष्ट न करता समोरून चालत आलेली नोकरी तिने करावी असे सुधाचे व आईचेही मत होते. पण, " नोकरी आणि मी करू? मग माझ्या माहेरीच सुखात होते की. बाबा मागितले की पैसे देत होते, घरात नोकरचाकर होते. मला मुळात तुमच्याशी लग्न करायचेच नव्हते पण आमच्या बाबांना मुलगा शिकलेला, चांगल्या बँकेत आहे आणि चार ...