मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:

साभार-लोकसत्ता/विशेष/संपतराव पवार/२६.०८.२००९

भारताच्या शेतीव्यवसायाने सुवर्णकाळ गाठला होता. पारंपरिक शेती निसर्गावर आधारित होती. देशी ऊस, हळद, खपली गहू ही पिके बागायती म्हणून केली जात. पावसाळ्यानंतर ओढय़ांना, नाल्यांना पाझराचे पाणी वाहत असे, त्यावर सामुदायिकरीत्या बांध घालून फडपद्धतीने ओढय़ाकाठच्या जमिनीस पाणी मिळे. विहिरीचे पाणी बैलाच्या मोटेने उपसून तुरळक ठिकाणी दिले जायचे. अपवाद वगळला तर बहुतांशी पाऊस नक्षत्रांप्रमाणे पडत असल्याने खात्रीने भुईमूग, ममदापुरी जोंधळा, डुकरी बाजरी, शेतगहू, हरभरा, करडई, ऊस, भात ही पिके आणि मटकी, हुलगा, ...
पुढे वाचा. : कोरडवाहू शेती (१) ‘उत्तम शेती’ ते असहायता